Thursday, October 22, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

आयटीआयमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनमानीला ऊत; वेळेआधीच कार्यालय सोडून जाण्याचा प्रकार वाढला

आयटीआयमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनमानीला ऊत; वेळेआधीच कार्यालय सोडून जाण्याचा प्रकार वाढला

कोरपना: शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) कार्यरत असलेले अनेक अधिकारी आणि कर्मचारी कामाच्या वेळेत गैरहजर राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे, तर दुपारनंतर अनेक जण कार्यालयातून वेळेपूर्वीच निघून जात असल्याने विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मोठे हाल होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आयटीआयमध्ये दररोज सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत कामकाजाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, संस्थेतील काही अधिकारी आणि कर्मचारी नियमितपणे या वेळेचे पालन करत नाहीत. सकाळी उशिरा येणे आणि दुपारच्या सत्रात वेळेपूर्वीच कार्यालय सोडणे हे नित्याचेच झाले आहे. यामुळे दाखला मिळवण्यासाठी येणारे विद्यार्थी, प्रवेश प्रक्रियेसाठी येणारे पालक आणि इतर कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते. अनेकदा संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी जागेवर नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो.

या प्रकारामुळे आयटीआयच्या कामकाजावर गंभीर परिणाम होत असून, संस्थेची प्रतिमा मलिन होत आहे. या बेजबाबदार वृत्तीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून गैरहजर राहणाऱ्या आणि वेळेपूर्वी कार्यालय सोडणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे.

Popular Articles

error: Content is protected !!