Friday, September 4, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

जिल्हा बालस्नेही करण्यासाठी तालुक्यातील बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण

जिल्हा बालस्नेही करण्यासाठी तालुक्यातील बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण

चंद्रपूर, दि.19 : जिल्हाधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष विनय गौडा जी. सी यांच्या मार्गदर्शनामध्ये व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा बालस्नेही करण्यासाठी सर्व तालुक्यातील बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले.

15 ही तालुक्यात आयोजित या प्रशिक्षणाला ग्राम बाल संरक्षण समितीच्या सचिव, अंगणवाडी सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी, सुपरवायजर, पोलिस विभाग, शिक्षक, पोलिस पाटील, ग्रामसेवक यांनी उपस्थित होते. बाल संरक्षण समिती संरचना, कर्तव्य व जिल्हा माहिला व बालविकास कार्यालय अंतर्गत योजनांची प्रचार प्रसिद्धी आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यात मिशन वात्सल्य योजना, चाईल्ड हेल्पलाईन 1098, महिला हेल्पलाईन 181, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर योजना, अनाथ प्रमाणपत्र योजना, दत्तक प्रकिया, बालसंगोपन योजना, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005, पोक्सो कायदा 2012, बालविवाह कायदा 2006, महिला सक्षमीकरण केंद्र, बेटी बचाओ बेटी पढाओ, कामाचे ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण कायदा आदी विषयांचा समावेश होता.

कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे, श्री. महाकाळकर, अतिशकुमार चव्हाण, विधी अधिकारी अनिल तानले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, जिल्हा समन्वयक अभिषेक मोहर्ले, शशिकांत मोकाशे, श्याम मोदिलवार, आर्यन लोणारे, परविन शेख आदी उपस्थित होते.

Popular Articles