Saturday, June 13, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

वरोरा तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी

वरोरा तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी

शेती विकासासाठी सूचना

चंद्रपूर, दि. ०५ : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा जी. सी. यांनी आज वरोरा तालुक्यात विविध कार्यांचा आढावा घेत क्षेत्रदौरा केला. सुरवातीला त्यांनी वरोरा येथील मतमोजणीसाठी ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि ईव्हीएम सुरक्षेसंदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मौजे शेगाव बुद्रुक येथील झुडपी जंगल गट क्रमांक 1 ची पाहणी केली. सदर जमीन डी-लिस्टिंगसाठीचा प्रस्ताव वन विभागास पाठविण्याची प्रक्रिया महसूल विभागाने गतिमान करावी, असे निर्देश त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिले. यानंतर चारगाव बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी मधुकर भलमे यांच्या तूर उत्पादन व बियाणे उत्पादन शेताला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. तेलबिया उत्पादन वाढीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब, प्रयोगशील शेती आणि नाविन्यपूर्ण पद्धतींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे सांगून कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे निर्देश त्यांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना दिले.

या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार योगेश कौटकर, पोलीस निरीक्षक श्री. तांबाडे, उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिणखेडे, मुख्याधिकारी नगरपरिषद वरोरा श्री. मेश्राम, तालुका कृषी अधिकारी श्री. राठोड, महसूल मंडळ अधिकारी अजय निखाडे यांसह तलाठी व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

Popular Articles