Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

“कोरपना एक्सप्रेस”चा दणका! बातमी प्रसिद्ध होताच महावितरणची कारवाई; हर्षदा नगरमधील वीज चोरी उघड

​’कोरपना एक्सप्रेस’चा दणका! बातमी प्रसिद्ध होताच महावितरणची कारवाई; हर्षदा नगरमधील वीज चोरी उघड

कोरपना : कोरपना येथील हर्षदा नगर या खाजगी लेआऊटमध्ये सुरू असलेल्या थेट वीज चोरीबाबतचे वृत्त “कोरपना एक्सप्रेस” मध्ये प्रसिद्ध होताच महावितरण विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. या बातमीचा मोठा ‘इम्पॅक्ट’ पाहायला मिळाला असून, महावितरणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन वीज चोरी करणाऱ्या लेआऊट धारकावर दणकेबाज कारवाई केली आहे.

👉 ​नेमके प्रकरण काय? कोरपना शहरातील हर्षदा नगर या खाजगी लेआऊटमध्ये गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या मुख्य वाहिनीवरून आकडे टाकून थेट वीज चोरी केली जात होती. यामुळे महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होत असतानाच, दुसरीकडे अधिकृत वीज ग्राहकांना कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत होता. या गंभीर प्रकाराकडे “कोरपना एक्सप्रेस” ने पुराव्यासह लक्ष वेधले होते.

​👉 बातमीचा परिणाम आणि कारवाई: बातमी प्रकाशित होताच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी ॲक्शन मोडमध्ये आले. महावितरणच्या भरारी पथकाने आज दुपारी हर्षदा नगरमध्ये धडक दिली. यावेळी लेआऊट धारकाकडून अनधिकृतपणे वीज वापरली जात असल्याचे स्पष्ट झाले.

👉 पथकाने तात्काळ: वीज चोरीसाठी वापरले जाणारे केबल, मोटार, स्टार्टर असे साहित्य जप्त केले. असून कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत वीज जोडणी खंडित केली. संबंधित लेआऊट धारकावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

​”वीज चोरी हा गंभीर गुन्हा आहे. ‘कोरपना एक्सप्रेस’ मधील बातमीची दखल घेऊन आम्ही ही कारवाई केली आहे. यापुढेही अशा प्रकारे अनधिकृत वीज वापरणाऱ्यांवर आमची नजर असेल.”

कनिष्ठ अभियंता, महावितरण. कोरपना

​या कारवाईमुळे परिसरात वीज चोरांचे धाबे दणाणले असून, सर्वसामान्यांनी “कोरपना एक्सप्रेस”च्या निर्भीड पत्रकारितेचे कौतुक केले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!