Saturday, June 13, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

पोलिस की ‘पळपुटे’ आरोपी? कोरपना पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांचा संशय; आर्थिक व्यवहाराची चर्चा जोरात!

पोलिस की ‘पळपुटे’ आरोपी? कोरपना पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांचा संशय; आर्थिक व्यवहाराची चर्चा जोरात!

​कोरपना: एकीकडे अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस कारवाईचा बडगा उगारत असल्याचे चित्र निर्माण केले जात असताना, दुसरीकडे मात्र ‘गाडी पकडली, पण आरोपी पळाला’ हा जुनाच पॅटर्न पुन्हा एकदा समोर आला आहे. गडचांदूर येथील कुख्यात सुगंधी तंबाखू तस्कर इस्तियाज किडीया याच्या ब्रिझा कारवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर आता कोरपना पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दिनांक १० मार्च रोजी रात्रीच्या अंधारात पोलिसांनी पाठलाग करून ४.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, ज्या गाडीचा पोलिसांनी पाठलाग केला, त्या गाडीतून आरोपी इस्तियाज किडीया पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी कसा झाला? हा प्रश्न आता सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

​नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार:

१. आर्थिक सेटलमेंटचा संशय: “गाडी पकडताना आरोपीला पळून जाण्यासाठी मोकळी वाट करून दिली का?” असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. यामागे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

२. अंधाराचे ‘सोयीस्कर’ कारण: प्रत्येक वेळी आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळतो, मग पोलिसांकडे तपासाची आधुनिक साधनं किंवा पुरेसा बंदोबस्त नव्हता का?

३. जुना रेकॉर्ड: संबंधित आरोपीवर यापूर्वीही अशाच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तरीही तो पोलिसांच्या जाळ्यात का अडकत नाही, हे एक गुपितच बनले आहे.

​तक्रारी असूनही कारवाईत शिथिलता?

​इस्तियाज किडीया हा सुगंधी तंबाखू तस्करीतील जुना खिलाडी असल्याचे बोलले जाते. त्याच्याविरुद्ध याआधीही अनेक गंभीर तक्रारी असूनही, तो दरवेळी पोलिसांच्या हातून निसटतो किंवा त्याला ‘निसटू दिले जाते’, याबद्दल आता संताप व्यक्त होत आहे.

​”पोलीस जर कारचा पाठलाग करू शकतात, तर पळून जाणाऱ्या व्यक्तीला का पकडू शकत नाहीत? ही कारवाई केवळ दाखवण्यासाठी होती की प्रत्यक्षात आरोपीला वाचवण्यासाठी?”

— नागरिकांमधील संतप्त सवाल

​आता तरी ‘खाकी’ची इज्जत वाचणार का?

​मुद्देमाल जप्त करणे ही कायदेशीर प्रक्रिया असली, तरी मुख्य सूत्रधार मोकाट राहिल्याने अवैध व्यवसायाचे जाळे कधीच नष्ट होत नाही. आता जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणार का? आणि फरार आरोपीला तात्काळ बेड्या ठोकणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Popular Articles