Monday, June 15, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

जिल्हाधिका-यांकडून बँकर्स प्रतिनिधींचा आढावा

जिल्हाधिका-यांकडून बँकर्स प्रतिनिधींचा आढावा

चंद्रपूर: डिसेंबर 2025 पर्यंत संपलेल्या तिमाहीत जिल्ह्यातील बँकांनी केलेल्या प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.25) घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष पोरकुटे, नाबार्डचे मुख्य व्यवस्थापक तृणाल फुलझेले, जिल्हा उद्योग केंद्राचे उपमहाव्यवस्थापक श्री. खरमाटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावर्षी कर्जमाफीची घोषणा सरकारने केली आहे, त्यामुळे बँकांनी जास्तीत जास्त शेतक-यांना पुढील हंगामासाठी कर्जवाटप करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सर्व बँकांना दिले. तसेच मुख्यमंत्री रोजगार गॅरंटी योजनेमध्ये खाजगी बँकांनी आपला सहभाग वाढवावा. जिल्ह्यातील विविध वित्तीय महामंडळांकडून आलेली लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे तातडीने निकाली काढून त्यांना दिलासा द्यावा. विनाकारण कर्ज प्रकरणे अडवून ठेवू नये. मत्स्यव्यवसाय करणा-या मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून द्यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी बँकांच्या प्रतिनिधींना दिल्या.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. पोरकुटे यांनी डिसेंबर 2025 पर्यंतचा सर्व बँकांचा आढावा, शासकीय योजनांची प्रगती, कर्जवाटप, थकबाकी आदींबाबत सादरीकरण केले.

Popular Articles