Sunday, October 25, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

जुन्या व्हिडिओच्या आधारे अफवा पसरवणे पडणार महागात; ‘MH 34’ ग्रुपवरील त्या पोस्टमुळे खळबळ

जुन्या व्हिडिओच्या आधारे अफवा पसरवणे पडणार महागात; ‘MH 34’ ग्रुपवरील त्या पोस्टमुळे खळबळ

कोरपना: सोशल मीडियाचा वापर माहिती देण्यासाठी करण्याऐवजी तो दहशत आणि अफवा पसरवण्यासाठी केल्यास त्याचे काय परिणाम होतात, याचा प्रत्यय कोरपना शहरात आला आहे. ‘MH 34 आपला चंद्रपूर’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर पेट्रोल टंचाई आणि स्फोटाबाबतची एक पोस्ट व्हायरल झाली होती, जी तपासाअंती पूर्णपणे बनावट आणि जुनी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सध्या देशात सुरू असलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीचा फायदा घेत काही समाजकंटकांनी कोरपना येथील ‘साईश्रद्धा पेट्रोल पंपा’बाबत एक पोस्ट व्हायरल केली.

या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की:

👉 पंपावर नियमांचे उल्लंघन करून बाटलीत पेट्रोल दिले जात आहे.

​👉 काही तरुणांनी कॅरीबॅगमध्ये पेट्रोल भरून स्फोट घडवून आणला.

👉 पंप मालक राजकीय दबावापोटी विशिष्ट नागरिकांना इंधन नाकारत आहेत.

​तपासात धक्कादायक वास्तव समोर: ही पोस्ट व्हायरल होताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, या घटनेशी संबंधित व्हिडिओ हा ४ ते ६ महिने जुना असल्याचे समोर आले आहे. सध्याच्या टंचाईशी किंवा कोणत्याही ताज्या स्फोटाच्या घटनेशी याचा दूरवरचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कायदेशीर कारवाईची टांगती तलवार

​विनाकारण भीती निर्माण करणे आणि एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने ही पोस्ट टाकल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याप्रकरणी आता खालीलप्रमाणे कारवाई होण्याची शक्यता आहे:

आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा: सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्याबद्दल कलम ६६ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.

​शांतता भंग केल्याचा ठपका: समाजात भीती पसरवून शांतता धोक्यात आणल्याप्रकरणी पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतात.

प्रशासनाचा इशारा: “नागरिकांनी कोणत्याही अपुऱ्या माहितीनिशी व्हिडिओ किंवा मेसेज फॉरवर्ड करू नयेत. अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलचे बारीक लक्ष आहे.”

Popular Articles

error: Content is protected !!