Saturday, October 24, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

कोरपना नगरपंचायतीचा कारभार की ‘भ्रष्टाचाराची गटार’? गुडघाभर पाण्यात नालीचे लेंटर; नियमांना बगल देत कामाचा उरक!

कोरपना नगरपंचायतीचा कारभार की ‘भ्रष्टाचाराची गटार’? गुडघाभर पाण्यात नालीचे लेंटर; नियमांना बगल देत कामाचा उरक!

​कोट्यवधींचा निधी धुळीला: गुणवत्तेचा पत्ता नाही, कंत्राटदार आणि प्रशासनाचे ‘साटलोटं’ असल्याचा नागरिकांचा संशय

कोरपना: कोरपना शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत सध्या सुरू असलेले नालीचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ‘नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ (NHAI) कडून प्राप्त झालेल्या कोट्यवधींच्या निधीतून हे काम केले जात आहे. मात्र, तांत्रिक नियमांना पूर्णपणे केराची टोपली दाखवून, चक्क साचलेल्या गुडघाभर पाण्यात लेंटर टाकण्याचे अघोरी प्रकार सुरू असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

​पाण्यात लेंटर; मजबुतीवर प्रश्नचिन्ह

​इंजिनिअरिंगच्या नियमांनुसार, कोणतेही काँक्रीटचे काम करताना जागा कोरडी असणे आणि पाण्याचा उपसा करणे अनिवार्य असते. मात्र, कोरपना येथे कंत्राटदाराचा मनमानी कारभार सुरू आहे. नालीमध्ये साचलेल्या सांडपाण्याचा उपसा न करताच त्यावर सिमेंटचे मिश्रण ओतले जात आहे. अशा पद्धतीच्या बांधकामामुळे नालीची भिंत काही दिवसांतच कोसळण्याची भीती निर्माण झाली असून, हा केवळ सरकारी पैशाचा अपव्यय असल्याचे बोलले जात आहे.

​​निकृष्ट साहित्याचा वापर: बांधकामासाठी वापरण्यात येणारी रेती, सिमेंट आणि लोखंडाचा दर्जा अत्यंत सुमार आहे.

​प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ मौन: नगरपंचायतीचे जबाबदार अभियंता किंवा अधिकारी कामाच्या ठिकाणी फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. हे काम त्यांच्या डोळ्यादेखत होत असतानाही कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

​जनतेच्या पैशाची लूट: जनतेच्या करातून जमा झालेला कोट्यवधींचा निधी कंत्राटदाराच्या घशात घालण्यासाठीच हे ‘निकृष्ट’ काम उरकले जात असल्याचा आरोप होत आहे.

​चौकशीची मागणी आणि जनक्षोभ

​या कामाबद्दल कोरपनावासीयांमध्ये तीव्र असंतोष असून, हे काम तातडीने थांबवण्याची मागणी होत आहे. जर या कामाची ‘गुणवत्ता नियंत्रण विभागा’कडून (Quality Control) चौकशी झाली नाही आणि दोषी कंत्राटदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल न घेतल्यास, कोरपना येथील नागरिक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. आता जिल्हा प्रशासन या ‘पाण्यातील’ भ्रष्टाचारावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!