Saturday, June 13, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

कोरपना तालुका कृषी विभागाचा पुढाकार: खरीप हंगामासाठी बियाणे व पीक प्रात्यक्षिक नोंदणी सुरू; महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

कोरपना तालुका कृषी विभागाचा पुढाकार: खरीप हंगामासाठी बियाणे व पीक प्रात्यक्षिक नोंदणी सुरू; महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

कोरपना: खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विविध शासकीय योजनांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक राबविले जाणार असून, यासाठी महाडीबीटी (MahaDBT) प्रणालीवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांनी केले आहे.

पुणे कृषी आयुक्तालयाच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. अन्नधान्य, तृणधान्य, भरडधान्य आणि कडधान्य पिकांचे उत्पादन व क्षेत्र वाढवणे.

​सुधारित वाणांचे उच्च दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध करून देणे, नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन करणे.

​अर्ज प्रक्रिया आणि अंमलबजावणी:

सदर योजना पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविली जात आहे. विभाग व जिल्ह्यांना प्राप्त झालेल्या उद्दिष्टानुसार (Target) पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.

​”शेतकरी बांधवांनी वेळेची मर्यादा राखून महाडीबीटी पोर्टलवर आपले अर्ज सादर करावेत. प्रमाणित बियाणे आणि पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध आहे.”

— गोविंद ठाकूर, तालुका कृषी अधिकारी, कोरपना.

​तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रावरून किंवा स्वतःच्या मोबाईलवरून महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

Popular Articles