आता सर्व सरकारी काम एकाच छताखाली! कोरपना येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ 24 जुलैला
पालकमंत्री अशोकजी उईके यांच्या अध्यक्षतेखाली शिबीर, नागरिकांच्या समस्यांचे जागेवर निराकरण
कोरपना: नागरिकांना शासकीय सेवांसाठी कार्यालयांच्या चकरा मारण्यापासून दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासन, महसूल विभाग तर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ चे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर दि. 24 जुलै 2026, शुक्रवार रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, हनुमान मंदिर जवळ, कोरपना येथे होणार आहे.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी मा. ना. श्री. अशोकजी उईके- मंत्री, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा हे राहणार आहेत.
शिबिराला खासदार मा. श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, आमदार मा. श्री. देवरावदादा भोंगळे, जिल्हाधिकारी मा. श्रीमती वसुमना पंत, जि.प. CEO मा. श्री. पुलकित सिंह, नगरपरिषद अध्यक्ष मा. श्री. निलेश ताजणे आणि उपविभागीय अधिकारी मा. श्री. रविंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या शिबिरात महसूल, आरोग्य, कृषी, समाजकल्याण, महिला बालविकास यासह सर्व शासकीय विभाग एकत्रित येणार आहेत. नागरिकांना विविध योजनांचा लाभ, दाखले, अनुदान आणि तक्रार निवारण एकाच ठिकाणी करून दिले जाणार आहे.
श्री. बालाजी कदम, उपविभागीय अधिकारी, कोरपना आणि तहसीलदार, कोरपना यांनी कोरपना तालुक्यातील सर्व नागरिकांना शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
“शासन आपल्या दारी” या संकल्पनेतून होणाऱ्या या शिबिरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जलद आणि पारदर्शकपणे सुटणार आहेत.




