Thursday, October 22, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

कोरपणा नगरपंचायतीच्या कंत्राटी सफाई कामगारांचे एल्गार; उद्यापासून ‘काम बंद’ तर २ ऑक्टोबरपासून धरणे आंदोलन!

कोरपणा नगरपंचायतीच्या कंत्राटी सफाई कामगारांचे एल्गार; उद्यापासून ‘काम बंद’ तर २ ऑक्टोबरपासून धरणे आंदोलन!

​किमान वेतनापासून वंचितांचे मोठे शोषण; प्रशासनाच्या आश्वासनांना कंटाळून कामगार आक्रमक

​कोरपणा: ✍️ मोहब्बत खान 

कोरपणा नगरपंचायतीमध्ये सेवा देणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांवर ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध कामगारांचा उद्रेक झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून किमान वेतनातील तफावत, तुटपुंजा पगार, सुरक्षेसाठी आवश्यक असणारे ‘सुरक्षा किट’ आणि भविष्य निर्वाह निधी (पीएफ) सारख्या मूलभूत लाभांपासून वंचित ठेवत या कामगारांचे पद्धतशीर आर्थिक शोषण केले जात आहे. याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत कंत्राटी सफाई कामगारांनी उद्या म्हणजेच १ ऑक्टोबरपासून ‘काम बंद’ आंदोलन आणि २ ऑक्टोबरपासून शहरातील राजीव गांधी चौक येथे धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

​प्रशासन आणि ठेकेदारांचे मूक समर्थन?

​या गंभीर समस्येबाबत कामगारांनी मा. तहसीलदार कोरपणा, कोरपणा पोलीस स्टेशन आणि नगरपंचायतीचे मा. मुख्याधिकारी यांना सविस्तर लेखी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनात खालील गंभीर मुद्दे मांडण्यात आले आहेत:

​नियमांना तिलांजली: शासकीय नियमावली आणि ‘लाड-पाग समिती’च्या शिफारशीनुसार कामगारांना वेतन व पीएफ दिला जात नाही.

​आर्थिक गैरव्यवहार: वेतनामध्ये मोठा भ्रष्टाचार व अपहार होत असून, कामगारांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे.

​सामाजिक शोषण: बहुतांश कंत्राटी सफाई कामगार हे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने त्यांना वारंवार डावलले जात आहे.

​आश्वासनांचा खेळ खल्लास; आता थेट संघर्ष!

​नगरपंचायत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत केवळ तोंडी आश्वासने (लालिपॉप) देऊन कामगारांची दिशाभूल केली आहे. न्याय हक्कासाठी आता माघार न घेण्याचा निर्धार करत कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या काम बंद आंदोलनामुळे कोरपणा शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Oplus_16908288

Popular Articles

error: Content is protected !!