Friday, July 3, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

NH-353-B उड्डाणपुलावर वाढदिवसाचा हैदोस! ट्रॅक्टर-हायवाच्या केकसह मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी

NH-353-B उड्डाणपुलावर वाढदिवसाचा हैदोस! ट्रॅक्टर-हायवाच्या केकसह मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी

 परवानगी कुणाची? कायदा कुणासाठी? ‘काँग्रेस कनेक्शन’ असलेल्या व्यक्तीचा खुलेआम नियमभंग, प्रशासन मूग गिळून गप्प

कोरपना: नॅशनल हायवे क्र. 353-B वरील कोरपना येथील नव्या उड्डाणपुलावर मध्यरात्री वाढदिवस साजरा करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियम धाब्यावर बसवून भर रस्त्यात गाडी उभी करून, केक कापून, फटाके फोडून हा ‘बर्थडे इव्हेंट’ साजरा करण्यात आला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उड्डाणपुलावर पांढऱ्या रंगाच्या Renault कारच्या बोनेटवर केक ठेवून वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे केकवर  ट्रॅक्टर आणि हायवा यांची प्रतिकृती बनवली होती. कारच्या बोनेटवर ‘PIYUSH’ असे लिहिलेले 6 छोटे केक आणि मधोमध मोठा केक ठेवला होता.

नियमांचा उडाला फज्जा: राष्ट्रीय महामार्ग अडवला: रात्रीच्या वेळी मुख्य उड्डाणपुलावर गाडी आडवी लावून वाहतूक रोखली गेली.

फटाक्यांची आतषबाजी: रस्त्यावरच फटाके, रॉकेट आणि लांब माळा पेटवण्यात आल्या. धुरामुळे इतर वाहनचालकांना धोका निर्माण झाला.

धोकादायक स्टंट: चालत्या पुलावर दुचाकीवर स्टंट, कारच्या बोनेटवर केक कापणे असे प्रकार घडले.

‘काँग्रेस कनेक्शन’ आणि अवैध धंद्यांची चर्चा

स्थानिक नागरिकांच्या मते, वाढदिवस साजरा करणारी व्यक्ती काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे आणि अवैध रेती-गौण खनिज तस्करीत गुंतलेली आहे. केकवर ट्रॅक्टर-हायवा याच अवैध धंद्याचे प्रतीक असल्याची चर्चा आहे. “सामान्य माणसाने रस्त्यावर गाडी लावली तर लगेच दंड होतो. हा व्यक्ती कोणाच्या आशीर्वादाने पुलावर फटाके फोडतो?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

कायदेशीर कारवाई काय होऊ शकते?

👉 मोटार वाहन कायदा 1988, कलम 177, 184: धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, रस्ता अडवणे – 6 महिने कारावास किंवा 5000 रु. दंड.

👉 भारतीय न्याय संहिता 2023, कलम 279: सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणा – 6 महिने कारावास किंवा 1000 रु. दंड.

👉 स्फोटक पदार्थ कायदा 1884: परवानगीशिवाय फटाके फोडणे – 2 वर्षे कारावास.

👉 राष्ट्रीय महामार्ग कायदा: महामार्गावर अतिक्रमण व अडथळा – गुन्हा दाखल होऊ शकतो.

प्रशासनाला प्रश्न: NH-353B सारख्या व्यस्त महामार्गावरील उड्डाणपुलावर पार्टीसाठी NHAI, RTO की पोलिसांनी परवानगी दिली?

– रात्री गस्त घालणारे पोलीस कुठे होते? 

– व्हिडिओमध्ये दिसणारी कार MH34CJ0422वर कारवाई होणार का?

‘जलन बरकरार रखना…’ गाण्यावर बेताल डान्स

व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे’ हे गाणे वाजत असून, कायदा-सुव्यवस्थेला थेट आव्हान दिल्याचे दिसते.

या प्रकरणी चंद्रपूर पोलिस अधीक्षक आणि NHAI च्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे. ‘सत्तेचा माज’ आणि ‘पैशाचा धाक’ दाखवणाऱ्या अशा लोकांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

प्रशासन उत्तर देणार का, की नेहमीप्रमाणे प्रकरण दाबले जाणार?  याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Oplus_16908288

Popular Articles