Friday, October 30, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

खाकीचा दणका! गडचांदूर पोलिसांची धडक कारवाई; ‘जे पॅलेस’ बारमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश!

खाकीचा दणका! गडचांदूर पोलिसांची धडक कारवाई; ‘जे पॅलेस’ बारमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश!

​तिघे ताब्यात; ६,५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त; कोरपणा तालुक्यात खळबळ!

​कोरपना: कोरपणा तालुक्यात अवैध धंद्यांचे लोण दिवसेंदिवस पसरत चालले असतानाच, गडचांदूर पोलिसांनी एका धडक कारवाईत जुगार अड्ड्यावर धाड टाकत मोठा पर्दाफाश केला आहे. गडचांदूर ते कोरपणा मार्गावरील ‘जे पॅलेस’ बिअर बारच्या मागील बाजूस सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी ही कारवाई केली असून, या धाडीमुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.

गडचांदूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या FIR (गुन्हा क्र. 0506/2026) नुसार, सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १:३७ ते २:३० या वेळेत ही कारवाई करण्यात आली. गडचांदूर ते कोरपणा मार्गावरील ‘जे पॅलेस’ बिअर बारच्या मागे काही जण पत्त्यांवर पैशांची पैज लावून हार-जीतचा जुगार खेळत असल्याची अत्यंत गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने पंचांसह थेट घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.

​⚖️ हे आहेत कारवाईच्या जाळ्यात अडकलेले आरोपी!

​पोलिसांनी घटनास्थळावरून जुगार खेळताना रंगेहाथ पकडलेल्या तिघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

👉 आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१. पंकज राजेश भसारकर २. संजय शालिक क्षीरसागर ३. प्रवीण शंकर लहितकर

​जुगार अड्ड्यावर टाकलेल्या या छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ६ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात प्रत्यक्ष आरोपींकडोल रोख रक्कम आणि जुगाराच्या डावावरील रकमेचा समावेश आहे:

  • ​पहिल्या व्यक्तीकडून: १,५५० रुपये
  • ​दुसऱ्या व्यक्तीकडून: १,७०० रुपये
  • ​तिसऱ्या व्यक्तीकडून: २,०२० रुपये
  • ​जुगाराच्या डावावरील रक्कम: १,२०० रुपये
  • ​५२ पत्त्यांचा संच: ५० रुपये
  • ​एकूण जप्त मुद्देमाल: ६,५२० रुपये

​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बलवंत रोशनलाल शर्मा करीत आहेत.

​जुगारासारख्या अवैध प्रकारांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असून सामाजिक वातावरणावर अत्यंत विपरीत परिणाम होत आहेत. गडचांदूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत होत असले, तरी अशा प्रकारच्या कारवाया केवळ एका घटनेपुरत्या मर्यादित न राहता, तालुक्यातील इतरही भागात फोफावलेल्या अवैध धंद्यांवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई कधी होणार? असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

​महत्त्वाची टीप: ही बातमी उपलब्ध प्रथम माहिती अहवालातील (FIR) नोंदींवर आधारित आहे. कायद्याच्या दृष्टीने गुन्हा दाखल होणे म्हणजे आरोपी दोषी सिद्ध होणे नव्हे. प्रकरणाचा पुढील तपास आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय नुसार वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

Popular Articles

error: Content is protected !!