Monday, November 23, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

मतदारांसाठी निवडणूक आयोगाची मोठी संधी!

मतदारांसाठी निवडणूक आयोगाची मोठी संधी!

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्यांना अंतिम यादीत नाव समाविष्ट करण्याची पुन्हा संधी

कोरपना : 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत मतदारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. प्रारूप मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या पात्र मतदारांना आता अंतिम मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घेण्यासाठी आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विशेष पुनरीक्षणादरम्यान काही मतदारांची नावे ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) या प्रवर्गांतर्गत समाविष्ट करण्यात आली होती. यामध्ये अनुपस्थित, स्थलांतरित, मृत तसेच दुबार नोंद असलेल्या मतदारांचा समावेश होतो. या प्रक्रियेमुळे संबंधित मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत.

मात्र, अशा मतदारांना अंतिम मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घेता यावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधित मतदारांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO यांच्याशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी आणि अंतिम मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक!

लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा प्रत्येक पात्र नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे केवळ मतदानाच्या दिवशीच जागरूक न राहता, मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घेणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रारूप यादीत नाव नसल्यास ही संधी दवडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, ७० राजुरा विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार, कोरपना यांच्या कार्यालयाकडून दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत प्रेस नोटद्वारे तालुक्यातील सर्व नागरिकांना हे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाचे आवाहन स्पष्ट : आपले नाव मतदार यादीत तपासा, BLO शी संपर्क साधा आणि मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा!

Popular Articles

error: Content is protected !!