Saturday, June 13, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

जिनिंगमध्ये ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

जिनिंगमध्ये ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

✍️ मोहब्बत खान

कोरपना: तालुक्यातील सोनुर्ली येथील नंदविजय जिनिंगमध्ये एका २५ वर्षीय ट्रक चालकाचा मृतदेह कापसाच्या गंजीखाली आढळल्याने खळबळ उडाली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच जेवरा फाटा येथील विदर्भ जिनिंगमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती, ज्यामुळे आता तालुक्यातील जिनिंगमधील कामगारांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेचा तपशील: मृतकाचे नाव: रोहित मोहे (वय २५ वर्षे) राहणार: देसगाव, जि. खंडवा (मध्य प्रदेश) वाहन: सिंग गोल्डन ट्रान्सपोर्ट, इंदूर यांचा ट्रक.​घटनाक्रम: रोहित १६ जानेवारी रोजी सायंकाळी सरकी खाली करण्यासाठी नंदविजय जिनिंगमध्ये आला होता. रात्री उशिरापर्यंत काम केल्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत जेवण करून झोपायला गेला. मात्र, १७ जानेवारीच्या सकाळी तो बेपत्ता असल्याचे लक्षात आले. शोधाशोध केली असता, सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह कापसाच्या गंजीखाली दबलेल्या अवस्थेत आढळला.

​प्रशासकीय कारवाई:​ कोरपणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, कोरपणा येथे पाठवण्यात आला आहे. मृताचे नातेवाईक मध्य प्रदेशांतून येणार असल्याने, शवविच्छेदन १८ जानेवारी रोजी केले जाणार आहे.

जिनिंगमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतेही ठोस उपाय दिसत नाहीत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे जिनिंग मालकांच्या बेजबाबदारपणावर संताप व्यक्त होत आहे. कामगार विभाग आणि स्थानिक प्रशासनाने यापूर्वीच्या घटनांनंतरही कडक पावले उचललेली दिसत नाहीत. स्थानिक आणि परप्रांतीय मजूर जीवावर उदार होऊन ‘रामभरोसे’ काम करत असल्याचे चित्र आहे.

कोरपणा तालुक्यातील जिनिंग उद्योग सध्या मृत्यूचा सापळा बनत चालले आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळता येतील.

Popular Articles