Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

घरकुल लाभार्थ्यांसाठी  रेती घाटाचा होणार शुभारंभ! 

घरकुल लाभार्थ्यांसाठी  रेती घाटाचा होणार शुभारंभ! 

आमदार देवराव भोंगळे दाखवणार हिरवी झेंडी. 

भोयगांव, सातरी, धाबा घाटावरून मिळणार मोफत रेती. 

राजुरा: केंद्र व राज्य सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय समाजातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर घरकुलाचे बांधकाम मंजूर केले असून त्या घरकुलांच्या बांधकामाकरिता लाभार्थ्यांना विनामूल्य रेती मिळावी यासाठी आमदार देवराव भोंगळे यांनी चारही तालुक्यातील तहसीलदारांची संयुक्त बैठक घेऊन घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य रेती मिळावी यासाठी चर्चा केली व राजुरा, कोरपना, गोंडपिपरी तालुक्यातील रेती घाटावरून रेती देण्याचा निर्णय घेतला असून त्याचा शुभारंभ उद्या (दि. २४) रोज शनिवारला होत आहे.

घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नसल्याने अनेकांचे रेती अभावी बांधकाम रखडलेले आहे रेतीचे दर गगनाला भिडले असून मोठी किंमत देऊन रेती विकत घेणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम थांबलेले आहे. राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतलेला असतांनाही अनेक लाभार्थी वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार देवराव भोंगळे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यातील चारही तहसीलदारांबरोबर संयुक्त बैठक घेऊन घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्यासंबंधी चर्चा केली त्यानुसार कोरपणा तालुक्यातील भोयगांव, राजुरा तालुक्यातील सातरी आणि गोंडपिपरी तालुक्यातील धाबा या रेती घाटावरून रेती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून उद्या दुपारी बारा वाजता कोरपणा तालुक्यातील भोयगांव, दोन वाजता राजुरा तालुक्यातील सातरी व सायंकाळी पाच वाजता गोंडपिपरी तालुक्यातील धाबा रेती घाटाचा शुभारंभ होत असून जास्तीत जास्त घरकुल लाभार्थ्यांनी या ठिकाणांहून रेतीचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार देवराव भोंगळे यांनी केले आहे.

या बैठकीला राजुराचे तहसीलदार ओमप्रकाश गोंड, गोंडपिपरीचे तहसीलदार शुभम बहाकर, कोरपणाच्या तहसीलदार पल्लवी आकरे, जीवतीच्या तहसीदार रुपाली मोगरकर, भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, शहराध्यक्ष सुरेश रागीट, गोंडपिपरीचे तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, गडचांदूर शहराध्यक्ष अरुण डोहे, अरूण मडावी, वामन तुराणकर, बाळनाथ वडस्कर, दिलीप गिरसावळे, नितीन वासाडे, अजय राठोड, प्रफुल घोटेकर, स्वाती वडपल्लीवार, कोमल फरकाडे, जगदीश पिंपळकर, भाऊराव बोबडे, सतीश जमदाडे, प्रदीप मोरे आदींची उपस्थिती होती.

Popular Articles

error: Content is protected !!