Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

चंद्रपुरात ‘या’ मार्गावरील वाहतूक ३ दिवस बंद; मतमोजणी व स्ट्रॉन्ग रूमसाठी पोलीस प्रशासनाचा निर्णय

चंद्रपुरात ‘या’ मार्गावरील वाहतूक ३ दिवस बंद; मतमोजणी व स्ट्रॉन्ग रूमसाठी पोलीस प्रशासनाचा निर्णय

​चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ चा कार्यक्रम जाहीर झाला असून, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट (झोन क्र. ०३) परिसरातील स्ट्रॉन्ग रूमची सुरक्षा आणि निवडणूक वाहनांच्या सुलभ आवक-जावकतेसाठी पोलीस प्रशासनाने वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.

​पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून, दि. १४ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत काही मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

​हे मार्ग राहतील बंद: निवडणुकीच्या मतपेट्यांची ने-आण करणाऱ्या बसेस आणि इतर तातडीच्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून खालील रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत:

👉 १) शिवशक्ती सिमेंट प्रोडक्शन ते हिरामोती फर्निचर दुकान पर्यंतचा रस्ता.

👉 २) हिरामोती फर्निचर दुकान ते आर्यन के स्टोर्ट शॉप पर्यंतचा रस्ता.

👉 ३) मराठा फॅब्रिकेशन दुकान ते एम.एस.सी.बी. कार्यालय आतील परिसर व स्ट्रॉन्ग रूमकडे जाणारा रस्ता.

​अधिसूचनेचा कालावधी:

​प्रारंभ: बुधवार, १४ जानेवारी २०२६ (सकाळी ०८:०० वाजेपासून)

​समाप्ती: शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ (सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत)

​नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:​ सदर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांशिवाय इतर बाहेरील नागरिकांसाठी हे मार्ग पूर्णतः बंद राहतील.

​या मार्गावर नागरिकांनी आपली वाहने पार्किंग करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

​निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.

​परिस्थितीनुसार या अधिसूचनेत बदल करण्याचे अधिकार प्रशासनाने राखून ठेवले आहेत. मतदानाच्या दिवशी होणारी गर्दी आणि स्ट्रॉन्ग रूमची संवेदनशीलता लक्षात घेता वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाने केले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!