Friday, October 23, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

जिल्हाधिका-यांकडून विविध विकास कामांची पाहणी

जिल्हाधिका-यांकडून विविध विकास कामांची पाहणी

चंद्रपूर, दि. 3 जून : राज्य शासनाने वरिष्ठ अधिका-यांना फिल्डवर जाऊन विकास कामांच्या प्रगतीचा आढावा तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.3) वरोरा तालुक्यातील विविध विकास कामांना भेट देऊन सदर कामांची पाहणी केली.

पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी विकास कामांच्या प्रगतीचे टप्पे व अडचणी आदीबाबत अधिकारी व नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात येत असलेले महिला बचत गटाच्या वस्तू विक्री शॉपिंग मॉलला भेट दिली. रोजगार हमी योजनेतून वरोरा तालुक्यातील सालोरी येन्सा येथील प्रगतशील शेतकरी यांच्या रेशीम उत्पादन व मलबेरी प्लांटेशन केंद्र, कॅम्पा निधीतून वन विभागद्वारे टेमुर्डा येथे राबविण्यात येणारे चारा गवत विकास प्रकल्प, नगर परिषद वरोरा व अंबुजा फाउंडेशन यांच्याद्वारे करण्यात येत असलेले वरोरा शहरातील गांधी सागर तलाव खोलीकरण कामाची पाहणी पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिका-यांसोबत उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार योगेश कौटकर, नगर परिषद मुख्याधिकारी विशाखा शेळकी, कनिष्ठ अभियंता श्री. खणके, वन परिक्षेत्र अधिकारी श्री. शेंडे , मंडळ कृषी अधिकारी श्री. काळे व इतर अधिकारी उपस्थित होते.

भद्रावती तालुक्याला सुध्दा भेट : जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भद्रावती तालुक्यातील कार्यकारी सहकारी संस्था येथे भेट दिली. तसेच पळसगाव येथील पूर पूर्व परिस्थितीची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. भद्रावती तालुक्यातील मौजा कुचना येथील जिल्हा परिषद शाळेची यावेळी त्यांनी पाहणी केली.

फोटो कॅप्शन : विविध विकास कामांची पाहणी करतांना जिल्हाधिकारी विनय गौडा.

Popular Articles

error: Content is protected !!