Saturday, June 13, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

धक्कादायक: कोरपना हादरलं! विदर्भ जिनिंगमध्ये कामगाराचा मृत्यू; ७ दिवसांपासून मृतदेह कुजत होता

धक्कादायक: कोरपना हादरलं! विदर्भ जिनिंगमध्ये कामगाराचा मृत्यू; ७ दिवसांपासून मृतदेह कुजत होता

राजकीय दबावाखाली प्रकरण दाबण्याचा प्रयत्न! कामगार वर्गात संतापाची लाट

कोरपना: कोरपना परिसरात एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. कोरपना येथील ‘विदर्भ जिनिंग’ मध्ये मालकाच्या आणि व्यवस्थापनाच्या टोकाच्या निष्काळजीपणामुळे एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, माणुसकीला काळिमा फासणारी बाब म्हणजे तब्बल सात दिवसांपासून या कामगाराचा मृतदेह जिनिंगमध्येच कुजलेल्या अवस्थेत पडून होता. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा खळबळजनक आरोप आता होत आहे.

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, मृत कामगार हा मूळचा मध्य प्रदेश (MP) येथील रहिवासी होता. तो कोरपणा परिसरातील ‘विदर्भ’ नामक जिनिंगमध्ये कामाला होता. २१ डिसेंबर २०२५ पासून तो बेपत्ता होता. पती घरी न परतल्यामुळे त्याची पत्नी दि. २३/१२/२०२५ रोजी तक्रार देण्यासाठी कोरपणा पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र, तिथे पत्नीची ‘मिसिंग रिपोर्ट’ (बेपत्ता असल्याची तक्रार) नोंदवून न घेता, पोलिसांनी तिला परत पाठवल्याचा गंभीर आरोप पत्नीने केला आहे.

त्याचे नाव संतोष मरावी असे आहे. संबंधित कामगार जिनिंगमध्ये कामावर असताना त्याचा मृत्यू झाला. मात्र, त्याच्या मृत्यूची माहिती बाहेर येऊ नये किंवा प्रशासकीय कारवाई टाळावी यासाठी जिनिंग प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मृतदेहाची झाली विटंबना: सलग सात दिवस मृतदेह जिनिंगमध्येच पडून राहिल्याने तो पूर्णपणे कुजला असून परिसरात दुर्गंधी पसरली होती. आठवडाभर उलटूनही व्यवस्थापनाला याची भणंग लागली नाही, यावर आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एका गरीब कामगाराच्या जीवाचे मोल शून्य आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

राजकीय दबावाचा आरोप: ​या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हे प्रकरण पोलीस दप्तरी किंवा लोकांसमोर येऊ नये यासाठी मोठे राजकीय प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. बड्या नेत्यांचा वरदहस्त असल्यानेच मृतदेह सात दिवस दडपून ठेवण्यात आला आणि आताही गुन्हेगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पीडित कुटुंबाच्या समर्थकांकडून होत आहे.

निष्काळजीपणा: विदर्भ जिनिंग मालकाचा गंभीर निष्काळजीपणा समोर.

👉 मृताची ओळख: कामगार  संतोष मरावी हा मध्य प्रदेशातील डिंदोरी जिल्ह्यातील रहिवासी.

👉 विदारक अवस्था: ७ दिवस मृतदेह कुजत राहिल्याने मानवी हक्कांचे उल्लंघन.

​👉 मागणी: दोषी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.

सध्या या घटनेमुळे कोरपना तालुक्यात तणावाचे वातावरण असून, पोलीस या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात आणि राजकीय दबावाला बळी पडतात की न्याय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles