Saturday, October 24, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

प्रवाशांचा जीव धोक्यात: ‘शिवाई’ वातानुकूलित, पण चालकांच्या चुकीमुळे धूळ आणि उष्णतेचा त्रास!

प्रवाशांचा जीव धोक्यात: ‘शिवाई’ वातानुकूलित, पण चालकांच्या चुकीमुळे धूळ आणि उष्णतेचा त्रास!

यवतमाळ – चंद्रपूर मार्गावर चालकांचा मनमानी कारभार; खिडक्या उघड्या ठेवून प्रवास

यवतमाळ/ चंद्रपूर: राज्य परिवहन महामंडळाने (ST) प्रवाशांचा प्रवास जलद, सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी अत्याधुनिक ‘शिवाई’ बस ताफ्यात दाखल केल्या आहेत. मात्र, यवतमाळ ते चंद्रपूर या मार्गावर धावणाऱ्या शिवाई बसच्या चालकांच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. गाडी वातानुकूलित (AC) असूनही चालक आपल्या केबिनच्या खिडक्या उघड्या ठेवून गाडी चालवत असल्याने, गाडीच्या आत धुळीचे साम्राज्य पसरत आहे.

​दुप्पट तिकीट देऊनही सुविधा शून्य शिवाई बसचे तिकीट साध्या बसच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. प्रवाशांनी जास्तीचे पैसे मोजूनही त्यांना धूळ आणि उष्णतेचा सामना करावा लागत आहे. एअर कंडिशनिंग सिस्टीम सुरू असताना खिडक्या उघड्या ठेवल्यामुळे कूलिंगवर परिणाम होतो आणि गाडीत मोठ्या प्रमाणात धूळ येते. यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा, विशेषतः श्वसनाचा प्रश्न निर्माण होत आहे.

चालकांची मनमानी यवतमाळ ते चंद्रपूर मार्गावर धावणाऱ्या बहुतांश शिवाई गाड्यांचे चालक आपल्या सोयीसाठी केबिनच्या काचा उघड्या ठेवतात. “आम्ही प्रवासासाठी प्रीमियम दर देतो, मग आम्हाला अशा प्रकारचा त्रास का?” असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. अनेकदा प्रवाशांनी विनंती करूनही चालक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.

प्रशासनाकडून कारवाईची मागणी वातानुकूलित बसमध्ये धूळ येणे हे केवळ असुविधाजनक नसून ते बसच्या अंतर्गत यंत्रणेसाठीही घातक ठरू शकते. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, अशा मनमानी करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करावी आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळेल याची खात्री करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

Popular Articles

error: Content is protected !!