Sunday, October 25, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

कोरपना शहरात चोरांचा धुमाकूळ; सीसीटीव्हीअभावी गुन्हेगारांचे धाडस वाढले!

कोरपना शहरात चोरांचा धुमाकूळ; सीसीटीव्हीअभावी गुन्हेगारांचे धाडस वाढले!

✍️ मोहब्बत खान

​कोरपना: कोरपना शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील एका बिअर बारमध्ये धाडसी चोरी झाली असतानाच, काल मध्यरात्री पुन्हा एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव असल्याने चोरट्यांना एकप्रकारे मोकळे रान मिळत असल्याचे चित्र आहे.

​नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शहरातील एका नामांकित ज्वेलर्सचे दुकान लक्ष्य केले. दुकानाच्या मागच्या बाजूची भिंत फोडून आत शिरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच काही कारणास्तव चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. मात्र, या घटनेमुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी बिअर बारमध्ये झालेल्या चोरीचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसतानाच ही दुसरी घटना घडल्याने पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

​सीसीटीव्हीचा अभाव: चोरट्यांसाठी ‘अभय’

​शहरातील मुख्य चौक आणि बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा फायदा चोरटे सर्रास घेत आहेत. तांत्रिक पुराव्यांच्या अभावामुळे पोलिसांनाही चोरट्यांचा माग काढणे कठीण जात आहे. “शहरात सीसीटीव्ही असते तर चोरट्यांवर वचक बसला असता आणि गुन्हेगारांची ओळख पटवणे सोपे झाले असते,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

​व्यापाऱ्यांची मागणी

​वाढत्या चोरीच्या सत्रांमुळे कोरपना येथील व्यापारी संघटना आक्रमक झाली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि नगर प्रशासनाने महत्त्वाच्या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Popular Articles

error: Content is protected !!