Monday, November 23, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

कारच्या डॅशबोर्डवरील छोटासा बाण ठरतो मोठा मदतनीस!

कारच्या डॅशबोर्डवरील छोटासा बाण ठरतो मोठा मदतनीस!

पेट्रोल टाकी कोणत्या बाजूला आहे? एका छोट्याशा चिन्हातून मिळते महत्त्वाची माहिती; वाहनचालकांसाठी उपयुक्त ठरणारी स्मार्ट सुविधा!

कोरपना: कार चालवताना अनेकदा अशा छोट्या गोष्टींकडे आपले लक्ष जात नाही, ज्या प्रत्यक्षात अत्यंत उपयोगी ठरतात. अशीच एक महत्त्वाची सुविधा म्हणजे कारच्या डॅशबोर्डवरील पेट्रोलच्या चिन्हाजवळ दिसणारा छोटासा बाण!

बहुतेक वाहनचालकांना डॅशबोर्डवरील पेट्रोल पंपाच्या चिन्हाची माहिती असते; मात्र त्याच्या शेजारी असलेल्या छोट्याशा बाणाचा नेमका उपयोग अनेकांना माहीत नसतो. हा बाण आपल्या कारची फ्युएल टाकी म्हणजेच पेट्रोल भरण्याची जागा गाडीच्या डाव्या बाजूला आहे की उजव्या बाजूला, हे दर्शवतो.

पेट्रोल पंपावर गेल्यानंतर अनेकदा वाहन कोणत्या बाजूने उभे करावे, याबाबत चालकांचा गोंधळ उडतो. विशेषतः नवीन कार चालवणाऱ्या चालकांना किंवा दुसऱ्याची कार वापरताना ही अडचण जाणवते. अशा वेळी डॅशबोर्डवरील पेट्रोलच्या चिन्हाजवळील बाण पाहिल्यास हा गोंधळ सहज दूर होतो. बाण ज्या दिशेला दर्शवतो, त्याच बाजूला कारची फ्युएल टाकी असते.

छोटीशी सुविधा, पण वाहनचालकांसाठी मोठी सोय!

वाहन उत्पादकांनी चालकांची सोय आणि वेळ वाचवण्यासाठी दिलेली ही एक साधी, पण अत्यंत उपयुक्त सुविधा आहे. त्यामुळे पुढच्या वेळी पेट्रोल पंपावर जाताना गाडीची टाकी कोणत्या बाजूला आहे, याचा अंदाज बांधण्याची गरज नाही. फक्त डॅशबोर्डवरील छोटासा बाण पाहा आणि योग्य बाजूने वाहन उभे करा!

लक्षात ठेवा, वाहनातील प्रत्येक छोट्या चिन्हामागे काहीतरी महत्त्वाची माहिती दडलेली असते.

Popular Articles

error: Content is protected !!