Friday, July 3, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

प्रशासनाचे दुर्लक्ष की अभय? कोरपना शहरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची जोमात विक्री!

प्रशासनाचे दुर्लक्ष की अभय? कोरपना शहरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची जोमात विक्री!

​किराणा दुकानांमधून चालतोय काळाबाजार; तंबाखू माफियांना मोकळे रान

​कोरपना: राज्यात सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही कोरपना शहरात मात्र नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे. ठिकठिकाणी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलीस विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात असताना, कोरपना शहरात मात्र तंबाखू माफियांना ‘मोकळे रान’ मिळाले असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगली आहे.

​कोरपना शहरातील अनेक छोट्या-मोठ्या किराणा दुकानांमध्ये छुप्या मार्गाने सुगंधित तंबाखूची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे, बंदी असलेल्या विविध नामांकित कंपन्यांचा सुगंधित तंबाखू चढ्या दराने ग्राहकांना उपलब्ध करून दिला जात आहे. प्रशासकीय यंत्रणेचा कोणताही धाक उरला नसल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.

​तरुणाई विळख्यात: सुगंधित तंबाखूच्या सहज उपलब्धतेमुळे शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढी मोठ्या प्रमाणात या व्यसनाच्या आहारी जात आहे. आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या या पदार्थांची विक्री करून काही दुकानदार स्वतःचे खिसे भरत आहेत, मात्र यामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

​दोषींवर कारवाई कधी?: इतर तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धाडी टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जात आहे. मग कोरपना शहरातच ही ‘सूट’ कोणामुळे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या अवैध व्यवसायाला स्थानिक प्रशासनाचे पाठबळ आहे की काय, अशी शंकाही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

“शहरातील गल्लीबोळातील दुकानांमध्ये सुगंधित तंबाखू सहज मिळत आहे. प्रशासनाने तात्काळ मोहीम राबवून या तंबाखू माफ्यांचे कंबरडे मोडणे गरजेचे आहे.”

— अमोल टोंगे, सामाजिक कार्यकर्ता , कोरपना

​आता अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलीस याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या तंबाखू विक्रीवर कधी कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles