Tuesday, October 13, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृती

इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृती

अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 मे पर्यंत

चंद्रपूर, दि. 13 मे : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्यूएस रँकिंग (जगभरातील 200 च्या आत विद्यापीठांची क्रमवारी) अंतर्गत परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये सन 2025-26 मध्ये प्रवेश घेतलेल्या 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी शाखानिहाय, अभ्यासक्रमनिहाय जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी www.obcbahujankalyan.maharashtra.gov.in किंवा https://.obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करावा तसेच परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रासह 17 मे 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सक्षम किंवा पोस्टाने संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे येथे दोन प्रतित सादर करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी केले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!