Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे वीज पोल कोसळून एकाचा मृत्यूःसखोल चौकशीची मागणी

ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे वीज पोल कोसळून एकाचा मृत्यूःसखोल चौकशीची मागणी

पुढील तपास सुरू

कोरपना: तालुक्यातील सावलहीरा हद्दीत वीज पोल कोसळल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून, संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ही घटना दि. 25/06/2025 सकाळी 10:00 च्या सुमारास घडली असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव आनंद प्रफुल जोगी (वय, 20 रा. सावलहीरा) असे आहे. आनंद हे सकाळी आपल्या शेतात काम करण्याकरिता गेला असता ही घटना घडली

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी आनंद यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून, तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

👉 निकृष्ट कामः ठेकेदाराने वीज पोलच्या स्थापनेदरम्यान निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आणि कामात अनियमितता दर्शवली.

👉हलगर्जीपणाः वीज वितरण कंपनीनेही ठेकेदाराच्या कामावर योग्य देखरेख ठेवली नाही किंवा तपासणी केली नाही, ज्यामुळे हा अपघात घडला.

👉सुरक्षिततेचा अभावः सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पायाभूत सुविधांच्या (इन्फ्रास्ट्रक्चर) सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या उदासीनतेवर या घटनेने प्रकाश टाकला आहे.

👉जनतेचा रोषः या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली असून, पोल हे काही दिवसांपूर्वीच लावण्यात आले होते , याबाबत चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

पोलिस या प्रकरणी गुन्हा दाखल करणार असून, ठेकेदाराचा शोध सुरू आहे. मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही करण्यात येत आहे.

या घटनेने सार्वजनिक सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कंत्राटदारांच्या कामाची कडक तपासणी आणि देखरेख यंत्रणा असणे अत्यंत आवश्यक आहे.

अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जुन्या आणि धोकादायक वीज पोलची तात्काळ दुरुस्ती किंवा बदल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Popular Articles

error: Content is protected !!