Monday, November 23, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

कोरपना येथे अवैध देशी दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; ८ बाटल्या जप्त

कोरपना येथे अवैध देशी दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; ८ बाटल्या जप्त

वॉर्ड क्रमांक १४ मधील कारवाईत ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई

कोरपना: कोरपना शहरात अवैध देशी दारू विक्रीविरोधात कोरपना पोलिसांनी कारवाई करीत एका इसमाकडून देशी दारूच्या आठ बाटल्या जप्त केल्या आहेत. दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

प्राप्त कागदपत्रांतील माहितीनुसार, कोरपना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना वॉर्ड क्रमांक १४, कोरपना येथील एका इसमाच्या घरी देशी दारूचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी केली.

यावेळी संतोष मधुकर कुरखेडे (वय ४२ वर्षे, रा. वॉर्ड क्रमांक १४, कोरपना) याच्या घराच्या परिसरात कागदी खोख्यात रॉकेट देशी दारूच्या ९० एमएल क्षमतेच्या एकूण आठ प्लास्टिक बाटल्या आढळून आल्या. या दारूची अंदाजे किंमत ३६० रुपये असल्याचे नमूद आहे. संबंधित व्यक्तीकडे दारू विक्रीसाठी आवश्यक परवाना आहे का, याबाबत विचारणा केली असता परवाना नसल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत दारूचा नमुना वेगळा करून उर्वरित मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पांडुरंग संभाजी पुपळवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस स्टेशन कोरपना येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद शामलाल रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अवैध दारूविक्रीला आळा बसणार का?

कोरपना शहर व परिसरात अवैध दारूविक्रीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी सातत्याने गस्त, तपासणी आणि कठोर कारवाई करण्याची गरज आहे. विशेषतः सार्वजनिक ठिकाणे, निवासी वस्त्या आणि तरुण पिढीवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता अशा अवैध व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण आणण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांची कारवाई ही केवळ एका घटनेपुरती मर्यादित न राहता अशा प्रकारांना कायमचा आळा घालण्यासाठी सातत्यपूर्ण असणे आवश्यक आहे.

Popular Articles

error: Content is protected !!