Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

कोरपना तालुका तहसील कार्यालयाचे आवाहन: दिव्यांग लाभार्थ्यांनी १५०० ऐवजी २५०० रुपये मानधनासाठी ‘ही’ कागदपत्रे तात्काळ जमा करा!

कोरपना तालुका तहसील कार्यालयाचे आवाहन: दिव्यांग लाभार्थ्यांनी १५०० ऐवजी २५०० रुपये मानधनासाठी ‘ही’ कागदपत्रे तात्काळ जमा करा!

​कोरपना: तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा व अपंग योजना विभागांतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. शासनाच्या नवीन निर्णयानुसार, आता दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून, लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे.

​​माहे ऑगस्ट २०२५ पर्यंत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा १,५००/- रुपये अनुदान देण्यात येत होते. मात्र, १५ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार हे अनुदान आता २,५००/- रुपये करण्यात आले आहे. या वाढीव लाभासाठी राज्य शासनाने आता वैश्विक ओळखपत्र (UDID Card) अनिवार्य केले आहे.

ज्या लाभार्थ्यांनी अद्याप खालील कागदपत्रे जमा केलेली नाहीत, त्यांनी दिनांक १६ मार्च २०२६ पर्यंत (पुढील २ दिवसांत) तहसील कार्यालयात ती सादर करणे आवश्यक आहे:

​दिव्यांग प्रमाणपत्र (UDID Card), ​आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, बँक खाते पासबुकची छायांकित प्रत​दिव्यांगत्वाचा मूळ दाखला.

​​ज्या लाभार्थ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र अद्याप ऑनलाईन अपडेट केलेले नाही, त्यांनी संबंधित विभागाकडून ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास अनुदान मिळण्यास तांत्रिक अडचण येऊ शकते.

​मदत हवी असल्यास संपर्क करा:

कागदपत्रे जमा करताना किंवा तांत्रिक अडचण आल्यास लाभार्थ्यांनी आपल्या गावातील कोतवाल किंवा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याशी संपर्क साधून मदत घ्यावी, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!