Monday, November 23, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

कोरपना पोलिसांची धडक कारवाई! नारंडा येथे अवैध देशी दारू विक्रीचा पर्दाफाश; १८ बाटल्या जप्त

कोरपना पोलिसांची धडक कारवाई! नारंडा येथे अवैध देशी दारू विक्रीचा पर्दाफाश; १८ बाटल्या जप्त

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची तत्पर कारवाई; अवैध दारू विक्रीविरोधात कोरपना पोलिसांचा कडक संदेश

कोरपना: कोरपना तालुक्यात अवैध दारू विक्रीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कोरपना पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा सक्रियता दाखवत नारंडा येथे धडक कारवाई केली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवैध देशी दारू विक्रीचा प्रकार उघडकीस आला असून, या कारवाईत देशी दारूच्या एकूण १८ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी कोरपना पोलीस ठाण्याचे पथक गस्त व अवैध धंद्यांविरोधात तपासणी करीत असताना मौजा नारंडा येथे एका व्यक्तीकडून देशी दारूची अवैध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी तपासणी केली.

यावेळी ९० मिली क्षमतेच्या रॉकेट संत्रा कंपनीच्या एकूण १८ देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची एकूण किंमत ८१० रुपये असल्याचे नमूद आहे. संबंधित व्यक्तीकडे दारू विक्रीचा अधिकृत परवाना नसल्याचे तपासणीदरम्यान समोर आले.

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम ६५(ई) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, पुढील तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम खुशालराव पंधरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

पोलिसांच्या सतर्कतेचे नागरिकांकडून स्वागत!

विशेष म्हणजे, गस्तीदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवर तातडीने कार्यवाही करीत पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात प्रभावी पाऊल उचलले आहे. कोरपना पोलीस प्रशासनाची ही तत्परता निश्चितच कौतुकास्पद असून, अशा कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांवर कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी सातत्याने गस्त वाढवावी, संशयास्पद ठिकाणांवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

अवैध धंद्यांविरोधात कोरपना पोलिसांची ही मोहीम अशीच सुरू राहिल्यास परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास निश्चितच मदत होईल.

Popular Articles

error: Content is protected !!