प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराकडून हत्या
नारंडा येथील घटना: मुख्य आरोपीसह सहकारी अटकेत
कोरपना : प्रेम संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची पत्नीच्या प्रियकरानी हत्या केल्याची घटना रविवार दिनांक १६ रोजी कोरपना तालुक्यातील नारंडा येथिल एका नाल्याजवळ सायंकाळच्या सुमारास घडली नितेश रामदास वाटेकर रा. नारंडा असे मृतकाचे नाव आहे. नितेशचे वनसडी येथे हेअर सलूनचे दुकान आहे.
तो आपल्या दुचाकीने आपल्या स्वगावी नारडा येथे अपडाऊन करत असायचा रात्रीचे नऊ वाजून ही तो परतला नाही. याच दरम्यान गावातील काही व्यक्तींनी नारंडा येथील खडक्या नाल्याजवळ दुचाकीसह नितेश पडून असल्याचे सांगितले. यावरून त्याचा भाऊ सतीश यांनी जाऊन पाहिले असता. त्याच्या डोक्याला गंभीर मारहाण झाल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे नेले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचं सांगितले. सन २०२२ पासून नितेश हा गडचांदूर येथे आपल्या पत्नी व मुलीसह किरायाणे राहत होता.याच दरम्यान बादल सोनी नामक व्यक्तीशी नितेशच्या पत्नीचे प्रेम संबंध जुळले होते.
गणपती उत्सव दरम्यान नितेश आणि बादल यांच्यात वाद सुद्धा झाला होता त्यावेळी बादल नितेशला जीवे मारण्याची धमकी दिली होती. नितेशची पत्नी साधना ही गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेली होती. त्यावेळी बादल नी माफी मागल्याने व पुढे त्रास देऊ नको असे साधनाच्या भावाने समजवल्यानंतर वादावर पडदा पडला होता. कुटुंब उध्वस्त होऊ नये म्हणून साधनाने तक्रार मागे घेतली होती. सोमवार दिनांक १६ रोजी वनसडी येथे बादलने एका मित्र समवेत दारू घेतली नितेश घरी परत असताना वाटेतच त्याच्या डोक्यावर कुठल्यातरी वस्तूने प्रहार केला तसेच त्याचा गळा सुद्धा आवळला.यामुळे तो गंभीर रित्या जखमी होऊन मृत पावला. याप्रकरणी कोरपना पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याने पोलीसानी आपली तपासचक्रे वेगाने फिरवून आरोपी बादल सोनी व त्याचा सहकारी तुषार येणगंटीवार रा. गडचांदूर यास अटक केली.
त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता ( बी. एन. एस ) २०२३ कलम १०३(१),३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेच्या पुढील तपासाचे कार्य (Further investigation) सध्या पोलीस निरीक्षक (Police Inspector) श्रीमती लता वाडीवे पोलीस निरीक्षक यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक लता वाडीवे हे सध्या या प्रकरणातील सर्व पैलूंचा सखोल अभ्यास (in-depth study of all aspects) करीत असून, घटनेशी संबंधित पुरावे (Evidence), साक्षीदारांचे जबाब (Witness statements) आणि इतर तांत्रिक माहिती (Technical Information) गोळा करत आहेत.
सदर तपास जलद गतीने सुरू असून, पुढील कायदेशीर कार्यवाही (Legal proceedings) योग्य दिशेने व्हावी, यासाठी ते आवश्यक ती तपासणी (Inquiries) पूर्ण करत आहेत.






